आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Bjp Leader Calls For Floor Test In A Letter To Governer Claiming Congress Mlas Ready To Leave Party

Exit Polls च्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशात राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस विरोधात अविश्वस ठराव मांडण्याची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलस समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे बहुमत नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अनेक आमदार कमलनाथ यांना कंटाळले असून बंडखोरीवर उतरले आहेत असा दावा भाजपने केला. राज्यातील विरोधी पक्षाने याच पार्श्वभूमीवर राज्यपाल गोपाल भार्गव यांना पत्र लिहून विधानसभेचे आपातकालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. कमलनाथ यांचे सरकार बहुमताच्या चाचणीत यशस्वी होणार नाहीत असेही भाजपने म्हटले आहे.


विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "एक्झिट पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पीएम बनणार आहेत. तर काँग्रेसला मध्य प्रदेशातून फक्त 2 किंवा 3 लोकसभा जागा मिळतील. यातून स्पष्ट होत आहे, की राज्यातील जनतेला आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही." ते पुढे म्हणाले, "काँग्रेसचे अनेक आमदार सीएम कमलनाथ यांना कंटाळले आहेत. ते भाजपसोबत येण्यास इच्छुक आहेत. अशात भाजप कुठल्याही प्रकारची घोडेबाजारी करणार नाही. परंतु, काँग्रेसचेच आमदार त्यांच्या सरकारसोबत नाहीत. त्यामुळे, तातडीने राज्य विधीमंडळाचे अधिवेश बोलावण्यात यावे." असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...