आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टमॉर्टम करणार तेवढ्यात 'मृतदेहा'तून आला रडण्याचा आवाज, मग समोर आले धक्कादायक सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका 72 वर्षीय रुग्णाला उपचारासाठी बुधवारी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी दुसऱ्याच दिवशी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी बोलावण्यात आले. शवविच्छेदनाची तयारी सुरू करण्यात आली. त्याचवेळी कथित मृतदेहातून हुमसून रडण्याचा आवाज आला. तपास केला तेव्हा संबंधित व्यक्ती श्वास घेत असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी नाव विचारले तेव्हा वृद्धाने ढसा-ढसा रडण्यास सुरुवात केली.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे, की 72 वर्षीय किशन काशीराम यांना बुधवारी सागरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना याच रुग्णालयातील डॉक्टर डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रात्री मृत घोषित केले. कमर्चाऱ्यांनी पोलिसांना मेमो पाठवला. त्यानुसार शवविच्छेदन केले जाणार होते. परंतु, अचानक आवाज आल्याने वृद्धाला उठवण्यात आले तेव्हा तो रडण्याशिवाय काहीच करू शकला नाही. त्याला तातडीने पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्याचे निधन झाले. स्थानिक माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आरएस रोशन यांनी संबंधित डॉक्टरांच्या विरोधात चौकशीचे आश्वासन दिले.