आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धाेधो पावसात भाषण सुरू ठेवण्याचे खा. मानेंचे ‘धैर्य’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - प्रचाराची रणधुमाळी उडत असताना पावसालाही उसंत नसल्याचे दिसते. वाळवा येथे इस्लामपूर (सांगली) मतदारसंघातील युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांची प्रचारसभा झाली. हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने हे भाषणासाठी उठणार तोच धो-धो पाऊस सुरू झाला. यामुळे कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली. मात्र, मानेंनी भाषण न थांबवता सर्वांना जागच्या जागी थांबण्याचे आवाहन केले. 
 
 

राज्यमंत्री सदाभाऊ खोतही भिजले 
व्यासपीठावर बसलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भिजू लागताच एका कार्यकर्त्याने त्यांना छत्री दिली. मात्र, लोक भिजत आहेत, आपण का नाही, असे म्हणत मानेंनी भाषण सुरूच ठेवले. व्यासपीठावरून नेत्यांसह चिंब झालेल्या कार्यकर्त्यांनी भाषण संपेपर्यंत मैदान सोडले नाही, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...