आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची 'मोबाईल' सभा; अंधारात रस्त्याच्या कडेला उभे राहून जनतेला केले संबोधित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी येथील सभा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही माघार न घेता अमोल कोल्हे यांनी चक्क मोबाईलवरुन सभा घेतली. अंधारात चांदवड नाशिक रस्त्याच्या कडेला उभे राहून त्यांनी मोबाईलवरुन भोसरी आणि चिंचवडमधील जनतेला संबोधित केले. 
 
पंतप्रधानांच्या पुण्यातील सभेमुळे अमोल कोल्हेंना परवानगी नाकारली गेल्याने राष्ट्रवादीचे समर्थक काहीसे खट्टू झाले होते. परंतु कोल्हेंनी मोबाईलवरून सभा घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
 

    ‘पिंपरी चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या. परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान सर्किटमध्ये नसतानाही औरंगाबादची परवानगीही नाकारण्यात आली’ असा आरोप अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. एरंडोलवरुन ते पुण्याला यायला निघाले. चिंचवड आणि भोसरी या दोन्ही ठिकाणी शक्य झाल्यास लाईव्ह स्क्रीनिंग करु, असे सांगितले. परंतु ‘डिजिटल इंडिया’च्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झाले नाही, असा टोलाही अमोल कोल्हेंनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...