आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. हीना गावित यांना डेंग्युची लागण, नवापूरात 50 पेक्षा अधिक डेंग्युचे रुग्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावित यांना डेंग्यु सदृश्य आजाराची लागण झाली आहे. डॉ. गावित यांनी डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे स्टेटस सोशल मिडिया व्हायरल केले आहे. यातून हीना गावित यांना काळजी घ्यावी असे मेजेस टाकण्यात येते आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील डेंग्यु सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. यात डॉ. हीना गावित यांना डेंग्यूने डंक मारला आहे. जिल्ह्यासह नवापूर शहरात आतापर्यंत शेकडो नागरिकांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आजारावर नियंत्रण करण्यास नवापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. 
गेल्या महिन्यात शहरातील फरहाण मकराणी वय 12 वर्षे, अब्दुल खालीक महंमद माकडा वय 17 वर्षे यांना डेंग्युची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डेंग्युचे वाढते प्रमाण पाहता शहरातील नागरिकांचा आक्रोश वाढला आहे. नवापूर शहराच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांची टिम स्वच्छतेकडे लक्ष देऊन आहे. प्रत्येक प्रभाग फवारणी केली जात आहे.नवापूर शहराची परिस्थिती नाजूक 


गेल्या महिन्यापासून डेंग्युसदृश रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. एकूण रुग्णांची संख्या 50 वर गेली आहे. अनेक रूग्ण गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत येथे खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्यातील 30 रुग्ण महापालिका हद्दीतील तर 20 रुग्ण शहराबाहेरील आहेत. याचा विचार केल्यास शहरातील स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.