आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. हीना गावित यांच्या बहिणीला विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरू दिला नाही, जाणून घ्या काय आहे नेमके कारण...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- भाजपा खासदार डॉ. हिना गावित यांची लहान बहिण सुप्रिया गावित यांना अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघातून उमेदवारी दाखल करता आली नाही. अक्कलकुवा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी सुप्रिया यांना 2 मिनीटे उशीर झाल्याने उमेदवारी अर्ज भरता येणार नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.


आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी भरता येणार होती. पण, भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या लहान बहिण सुप्रिया गावित यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 मिनीटे उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी भरु दिली गेली नाही. डॉ. विजयकुमार गावित यांच्या दुसऱ्या कन्या सुप्रिया या अक्कलकुवा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. मात्र नंदुरबारमध्ये सुरक्षेसाठी वडीलांनी तिला अपात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्यानंतर त्या अक्कलकुवा येथे अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, त्यांना वेळेत न पोहोचत आल्याने उमेदवारी अर्ज भरता आला नाही. 
 

शिवसेनेला काँग्रेसचे आव्हान 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विक्रांत मोरे यांच्यासह अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित होते. अक्कलकुवा मतदार संघातून शिवसेनेचे आमशा पाडवी यांचे टिकीट कापले जाईल अशी चर्चा होती, त्यांच्या जागी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होते. मात्र या चर्चेला चुकीचे ठरवत शिवसेनेने पाडवी यांची उमेदवार कायम ठेवली आहे. अक्कलकुवा सीटकडे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी काँग्रेस मधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर येथील निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. याठिकाणी शिवसेनेला काँग्रेस पक्षाचे गेल्या सहा वेळेपासूनचे आमदार असलेले के सी पाडवी यांचे आव्हान राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...