आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सायकलवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राज्यसभा खासदार आणि धनगर नेते पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी आज सकाळी मतदान जागृतीसाठी अनोख्या पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महात्मे हे सायकलवरून मतदान करण्यास मतदान केंद्रात पोहोचले. खासदार डॉक्टर विकास महात्मे आपल्या घरापासून नागपुरच्या विवेकानंद नगर मनपा शाळेच्या मतदान केंद्रापर्यंत सायकलने आले. याशिवाय नियमानुसार अर्धा तास सामान्य रांगेत उभे राहून डॉ. महात्मे यांनी मतदान केले. 

डॉ. विकास महात्मे हे आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. हीच परंपरा त्यांनी दिल्लीतही कायम ठेवली. ते दिल्लीत असताना संसद भवनामध्ये सायकलनेच जातात. डॉ. विकास महात्मे सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ आहेत आणि त्यांनी आतापर्यंत लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...