Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mp nilesh rane completed development works

चिपळूणमध्ये खासदार निधीतून कामे पूर्ण

divya marathi team | Update - May 20, 2011, 05:13 PM IST

खासदार निधीतून चिपळूण तालुक्‍यात 70 लाखांची कामे करण्यात आली आहेत.

  • mp nilesh rane completed development works

    रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नीलेश राणे यांच्या खासदार निधीतून चिपळूण तालुक्‍यात 70 लाखांची कामे करण्यात आली आहेत.

    काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन रेळेकर यांनी खासदार निधीतून कामे होत नसल्याचा कार्यकर्त्यांचा झालेला गैरसमज आम्ही कामे करून दूर केल्याचे म्हटले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बोलविण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी "खासदार कामे करीत नाहीत', अशी तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर रेळेकर आणि युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.Trending