आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Nusrat Jaha's Honeymoon Photos Went Viral, Actress Posing With Drinks In Hand

खासदार नुसरत जहाचे हनीमून फोटो झाले व्हायरल, हातात ड्रिंक घेऊन बीचवर पोज देताना दिसली अभिनेत्री 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां आपला पती निखिल जैनसोबत मॉरीशिसला हनीमूनसाठी गेली होती. आता दोघेच आपल्या घरी परतले आहेत. रविवारी नुसरतने आपली पहिली हरियाली तीज साजरी केली. याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होतेच. तर आता नुसरत-निखिलच्या हनीमूनचे फोटोदेखील व्हायरल होत आहेत. 
 
या फोटोमध्ये नुसरत एका बीचकवर पोज देताना दिसत आहे. नुसरत एका बोटवर बसलेली दिसत आहे. यावेळी तिने वन पीस परिधान केला आहे. सोबतच आपल्या केसांमध्ये फूलदेखील माळले आहे. आणखी एका फोटोमध्ये नुसरत बीचच्या किनाऱ्यावर रेस्तरॉच्या बाहेर ड्रिंक पिताना दिसत आहे. मोकळे केस आणि चष्म्यामुळे तिचा लूक फारच ग्लॅमरस दिसत आहे. 
 
नुसरतने निखिल जैनसोबत 19 जूनला लग्न केले होते. नुसरत आणि निखिलने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. त्यांचे लग्न तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाले होते. लग्नानंतर त्यांनी रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शनमध्ये चित्रपट, राजकारण यांसह इतर क्षेत्रातील मान्यवर सामील झाले होते.