आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला, पडाळी येथे प्रचारादरम्यान तरुणाने केले वार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

उस्मानाबाद - खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने चाकू हल्ला केला. आरोपी तरुणाने सुरुवातीला ओमराजे यांच्या हातात हात दिला. यानंतर दुसऱ्या हाताने हातावर आणि मनगटावर वार केले. मनगटावर चाकूचा वार बसून ते जखमी झाले. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावातील रस्त्यावर चालत होते. त्याचवेळी गर्दीत घुसून आरोपीने हल्ला केला आणि पसार झाला.


ओमराजे यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचे पाहता एकच खळबळ उडाली. खासदारांना वाचवण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि त्याचाच गैरफायदा घेत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेतला परंतु, काहीच हाती लागले नाही. दरम्यान, या हल्ल्यानंतर ओमराजे यांच्या मनगटीला इजा झाली असून ते सध्या सुखरूप आहेत.

दोन दिवसांपासून हल्ल्याचा प्रयत्न -ओमराजे
आपल्यावर अशा स्वरुपाच्या हल्ल्याचा गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे असा आरोप ओमराजे यांनी केला आहे. ते एका खासगी माध्यमाशी बोलत होते. विविध सभा आणि रोड शोमध्ये लोक दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचाच हा एक प्रकार असल्याचे ओमराजे म्हणाले. परंतु, यासाठी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. सोबतच, हल्ल्याच्या घटनेनंतर आपण सुरक्षेची मागणी करणार आहोत असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...