Home | Maharashtra | Vidarva | Akola | MP Police van Accident Near Nandura highway 4 dead 3 injured

मुलीला पळवून नेलेल्या आरोपींच्या कारला कंटेनरची धडक, चार ठार; मुलीच्या प्रियकरासह दोन पोलिस जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 11:26 AM IST

नांदुरा ते मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

  • MP Police van Accident Near Nandura highway 4 dead 3 injured

    मलकापूर- अल्पवयीन मुलीस पळवून नेलेल्या आरोपी आणि त्याच्या नातेवाइकांना परत आणणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने चार जण जागीच ठार तर मुलीच्या प्रियकरासह दोन पोलिस जखमी झाल्याची घटना मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील काटी येथे सोमवारी घडली. दरम्यान, तीन मृत जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. मनोज रामेश्वर खरेबीन (32), सुनील गौरीशंकर केवट (38), अंबादास लोथे (35, रा. कापसी रोड, जि.अकोला) आणि अविनाश ओंकार रायबोले (35, रा. बोरगाव मंजू) अशी मृतांची नावे आहेत.

    मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील कनाड गावामधील एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीस अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील रोहित अविनाश रायबोले (23) याने पळवून नेले होते. तक्रारीनुसार पोलिस उपनिरीक्षक दीपक मंडलोई, पोलिस कर्मचारी मुकेश कनोज व मुलीचे वडील असे तीन जण रविवारी बोरगाव मंजूत दाखल झाले. पोलिसांनी आरोपी रायबोलेसह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. आरोपींना नेण्यासाठी पोलिसांनी कार भाड्याने केली. त्यांच्यासोबत आरोपीचे नातेवाईकदेखील होते. पहाटे साडेपाच वाजता काटी फाट्याजवळ येताच त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातात झायलो कार हवेत उडून पाठीमागून येणाऱ्या फोर्ड कारवर आदळली. यात कारमधील चार जागीच ठार झाले. दुसऱ्या अपघातात एक ठार झाला.

Trending