आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेत गोडसेचा उल्लेख आल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्या टिप्पणीवरून वाद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रज्ञा ठाकुर यांच्या वक्तव्याला रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले
  • लोकसभा निवडणुकीवेळसही प्रज्ञा यांनी गोडसेचा देशभक्त असा उल्लेख केला होता
  • मी मनातून कधीच त्यांना माफ करू शकणार नाही- मोदी

नवी दिल्ली - भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसेचा उल्लेख आल्यानंतर एक टिप्पणी करत पुन्हा वाद सुरू केला. त्यांनी लोकसभा निवडणूक सुरू असतानाही गोडसेला देशभक्त संबोधले होते. तेव्हा त्यांनी माफी मागितल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते की, प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही. एसपीजी (दुुरुस्ती) विधेयकाच्या चर्चेदरम्यान द्रमुक खासदार ए. राजा यांनी नथुराम गोडसे याचे 'ते' वक्तव्य वाचण्यास सुरुवात केली, ज्यात त्याने महात्मा गांधी यांची हत्या का केली याचे कारण सांगितले होते. राजा म्हणाले,' ३२ वर्षांपासून आपला गांधींवर राग होता आणि अखेर त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला हे गोडसेने स्वत: कबूल केले होते. नथुराम गोडसे एक विशिष्ट विचारसरणी मानत होता, त्यामुळे त्याने गांधींची हत्या केली.' यावर प्रज्ञा यांनी मध्येच टोकाटोकी केली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या या टिप्पणीला जोरदार विरोध केला. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हेही प्रज्ञा यांना बसण्याचा इशारा करताना दिसले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही टिप्पणी रेकाॅर्डवरून हटवली. त्यानंतर चर्चेत सहभागी झालेले काँग्रेसचे सदस्य गौरव गोगोई म्हणाले की, 'गोडसे देशभक्त होता, असे एक सदस्य म्हणाल्या आहेत. त्यांनी माफी मागावी.'

भाजपचा द्वेषाच्या राजकारणाचा चेहरा दिसतो : काँग्रेस
प्रज्ञा यांना टोला लगावताना काँग्रेसने म्हटले आहे की, गोडसेला वारंवार देशभक्त म्हणणे यातून भाजपचा द्वेषाच्या राजकारणाचा खरा चेहरा दिसतो. पंतप्रधान मोदी प्रज्ञा यांच्या टिप्पणीला विरोध करतील की चुप्पी साधतील? दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले,'देश महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे आणि भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर महात्मा गांधी यांचा हत्यारा गोडसेला शहीद संबोधून त्यांचे महिमामंडन करत आहे. गोडसेची विचारसरणी असणाऱ्या भाजप नेत्यांनी जो गांधीवादाचा मुखवटा लावला होता, तो आज संसदेत उतरला आहे. मोदीजी, देश तुम्हाला आणि भाजपला मनापासून कधीही माफ करणार नाही.'

प्रज्ञांचे स्पष्टीकरण : उधमसिंह यांच्याबद्दल बोलले होते
सभागृहाबाहेर विचारले असता प्रज्ञा म्हणाल्या की, 'आधी ते पूर्ण ऐका, मी उद्या उत्तर देईन.' मात्र, त्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना माझी टिप्पणी गोडसेबद्दल नव्हती, तर उधमसिंह यांच्याबद्दल होती, असे स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, 'चर्चेदरम्यान राजा यांनी सर्व देशभक्तांना देशाचे शत्रू आणि दहशतवादी असे संबोधले. चर्चा सुरक्षेच्या मुद्द्यावर होती आणि राजा हे उधमसिंह यांच्या देशभक्तीबाबत बोलले. ते म्हणाले की, जालियनवाला बाग नरसंहारानंतर २० वर्षांपर्यंत उधमसिंह यांनी मनात राग बाळगला होता. जेव्हा ते बोलतच राहिले तेव्हा मी त्यांना देशभक्तांचे नाव घेऊ नका, असे म्हणून रोखले.' संसदीय कामकाजमंत्री जोशींनीही त्याचा पुनरुच्चार केला.

बातम्या आणखी आहेत...