Home | Maharashtra | Vidarva | Akola | MP Prataprao Jadhav criticism on government

उद्योजकांचे कोटींचे कर्ज माफ करणारे शेतकऱ्यांना का झुलवतात : खा. जाधव

प्रतिनिधी | Update - Aug 09, 2018, 12:14 PM IST

हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन सुद्धा फक्त ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यास उदासीन का आहे...

  • MP Prataprao Jadhav criticism on government

    खामगाव- मागणी नसतानाही देशातील उद्योजकांना लाखो-कोटींचे कर्ज माफ करणारे सरकार मात्र हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन सुद्धा फक्त ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यास उदासीन का आहे असा सवाल खा. प्रतापराव जाधव यांनी सरकारला केला.


    खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांनी विशेष बाब म्हणून मंजूर झालेल्या खामगाव-देऊळगाव साकर्शा-मेहकर रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन ४ ऑगस्ट रोजी दुपारी खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


    या कार्यक्रमाला मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमूलकर, भय्यासाहेब देशमुख यांच्यासह खामगाव तथा मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. संजय रायमूलकर होते. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, उप जिल्हाप्रमुख राजेंद्र वाडेकर, उपजिल्हाप्रमुख खामगाव संजय अवताडे, उपजिल्हाप्रमुख शेगाव संतोष लिप्ते, मेहकर तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, खामगाव तालुका प्रमुख प्रा. अनिल अमलकार, तालुका प्रमुख रमेश पाटील, सुनिल अग्रवाल, शहर प्रमुख, तालुका प्रमुख बळीभाऊ मापारी, विधानसभा संघटक हरीदास हुरसाड, मेहकर कॉटन मार्केट सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे, सभापती संतोष मापारी, उपसभापती विठ्ठल नागरे, पं. स सभापती प्रतिभाताई वानखडे, उपसभापती राजु घनवट, खविसं अध्यक्ष मधुमामा रहाटे, जि. प. सदस्य, गटनेते आशिष रहाटे, जि. प. सदस्य राजेंद्र पळसकार, तेजराव जाधव, संतोष चनखोरे, भगवानराव कोकाटे, पं. स. सदस्य सुपाजी पायघन, निंबाजी पांडव, वर्षाताई मवाळ, महिला आघाडी तालुका प्रमुख इंदुताई राणे खामगाव, किसान सेना तालुका प्रमुख सुरेश वावगे खामगाव, दे.साकर्शा सरपंच उषाताई वानखडे, सरपंच तालुका संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर देशमुख, गजानन चनेवार, सहदेवराव आल्हाट, केशवराव जागृत, मोतीचंद राठोड, संचालक पंजाबराव गवई, सागर पाटील, प्रकाश सानप, शिवसेना उपतालुका प्रमुख समाधान साबळे, विश्वासराव सवडतकर, विभाग प्रमुख दे. साकर्शा, अशोक ओरकर, शाखा प्रमुख दे. साकर्शा दिलीप नवत्रे, देविदास समुद्रवार, गणेश पाटील, बाळू वानखडे, दिलीप रोतळे, गजानन रोतळे, गोपाळ निकस आदी उपस्थित होते. संचालन अॅड. श्याम काळे यांनी तर आभार गणेश पाटील यांनी मानले.

Trending