आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी- "मी मलेशियामध्ये आहे, माझा भाऊ भारतातून मला भेटण्यासाठी मलेशियाला आला आहे. त्याचा पर्यटन व्हिसा वैध आहे, परंतु त्याला मलेशिया विमानतळावर थांबवण्यात आले असून प्रवेश नाकारण्यात आला आहे. आम्हाला तात्काळ मदत हवी आहे," अशा आशयाचे ट्वीट जिल्ह्यातील तरुणाने खा.प्रीतम मुंडे यांचा उल्लेख करून केले. मदतीची या सादेला खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन परदेशात असलेल्या त्या तरुणांना लाख मौलाचा आधार दिला.
आष्टी तालुक्यातील अमोल गोल्हार हे कामानिमित्त मलेशियामध्ये वास्तव्याला आहेत. अमोल गोल्हार यांचा भाऊ त्यांची भेट घेण्यासाठी मलेशियाला गेला, परंतु विमानतळावरच त्यांना थांबवून प्रवेश नाकारण्यात आला. दूरवरून आलेल्या आपल्या भावाला प्रवेश नाकारल्याने हताश झालेल्या अमोल गोल्हार यांनी प्रीतम मुंडे यांचा उल्लेख करून मदत करण्याची विनंती ट्विटद्वारे केली. गोल्हार यांच्या ट्विटला प्रतिसाद देऊन प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यालयाला यासंबंधी माहिती घेण्याच्या सूचना केल्या.
संबंधितांची माहिती मिळताच मुंडे यांच्या कार्यालयाकडून त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला व प्रीतम मुंडे आपल्याला मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत निश्चिंत राहा असे गोल्हार यांना कार्यालयातून कळवण्यात आले. तत्पूर्वीच अमोल गोल्हार यांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मलेशियाने भारताकडे रवाना केले होते. परंतु मायदेशापासून हजारो मैल दूर असूनही आपल्या जिल्ह्याच्या खासदार एका ट्विटची दखल घेऊन संकट समयी मदतीसाठी धावल्या या भावनेने त्या तरुणाला लाख मौलाचा आधार मिळाला.
धन्यवाद प्रितमताई...तरुणाने मानले आभार
इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भावाला प्रवेश नाकारल्याने हताश झालेल्या तरुणाने अनेक मंत्री, अधिकाऱ्यांनकडे ट्विटद्वारे मदतीची अपेक्षा केली. परंतु प्रीतम मुंडे यांच्या व्यतिरिक्त कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. परदेशात उद्भभवलेल्या या परिस्थितीत मुंडे यांनी प्रतिसाद देऊन मदतीचा हात पुढे केल्याने संकट समयी लाख मौलाचा आधार त्या तरुणाला मिळाला व लगेचच त्या तरूणाने ट्विट करून प्रीतम मुंडेंचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.