आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधीसोबतच पाहायला मिळाला डॉक्टर, खासदार प्रीतम मुंडेंनी केली अपघातग्रस्त महिलेची मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातला लोकप्रतिनिधी सर्वानांच ठाऊक आहे, पण आता त्यांच्यातला डॉक्टरही बीडकरांना पाहायला मिळाला. प्रीतम मुंडे रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली. यानंतर गाडी थांबवून मुंडे महिलेकडे धावत गेल्या आणि महिलेला पाणी दिले. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी अशीच एका रुग्णाला मदत केली होती.

 

लिंबोटा येथील श्रमदान आटोपून सिरसाळामार्गे सरफराजपूरकडे श्रमदानानिमीत्त जात असताना पांगरीपासून काही अंतरावर लताबाई प्रकाश भोसले(रा.गव्हाणे कौडगाव ता.परळी) या दुखापतग्रस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या असल्याचे प्रीतम मुंडेंना दिसले. जखमी महिलेला पाहताक्षणी प्रीतम मुंडेंनी गाडी थांबवून दुखापतग्रस्त महिलेकडे धाव घेतली. महिलेला स्वतःहून पाणी प्यायला देत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. जखमी महिला लताबाई भोसले यांना पांगरी येथील माऊली क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.


प्रीतम मुंडे या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. त्या उच्चशिक्षीत असून, त्यांनी M.D. (Dermatology, Venereology & Leprosy) शिक्षण घेतले आहे. वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर प्रीतम मुंडे राजकारणात आल्या होत्या. देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे.


 

बातम्या आणखी आहेत...