आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार प्रीतम मुंडेंचा जिल्ह्यात नुकसान पाहणी दौरा, रस्ता नव्हता म्हणून बैलगाडीतून केली नदी पार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- खासदार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आज(रविवार) बीड तालुक्यातील पीक नुकसानीचा दौरा केला. यावेळी तालुक्यातील वाकनाथपूर येथे पिकांची पाहणी करण्यासाठी प्रीतम मुंडे पोहोचल्या तेव्हा गावात जाण्यासाठी नदीवर पूल नव्हता. त्यामुळे त्यांना गावात पाहणी करण्यासाठी बैलगाडीतून नदी पार करावी लागली.



सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमाना घातले आहे. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. यातच राज्यातील नेते नुकसान दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याच्या घासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी दौरा केला. यावेळी त्या तालुक्यातील वाकनाथपूरमध्ये नुकासानीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता, गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे शेवटी त्यांना बैलगाडीने नदीच्या पाण्यातून गावात जावे लागले. गावात जाऊन त्यांनी ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करून खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. या संकटात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये केंद्र व राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के भाजप नेते राजेंद्र बांगर गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...