आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात \'बॅट\' घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार खासदार राजू शेट्टींसह स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार हाता बॅट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्ह दिले आहे.

 

स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला 'बॅट' हे चिन्ह अधिकृत केले आहे. खासदार शेट्टी  बॅट हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी बॅट हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत.

 

दरम्यान पक्षाला नवे चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटींग करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...