आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश जगताप

करमाळा- तालुक्यातील कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. सरसकट पिकांचे फेर पंचनामे करण्याची सूचना केली आहे. तर परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांना सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकरांनी बुधवार(दि.13) रोजी करमाळा तालुक्याचा नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पांडे, फिसरे, सालसे,आळसुंदे या गावांना भेटी दिल्या. यावेळी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधला.

शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान व इतर झालेला खर्च याची माहिती दिली व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणीही केली. पाहणीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत, का असे विचारत होते. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे झाल्याचे सांगितले तर आळसुंदे येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी हे फक्त कांदा पिकांचे पंचनामे करत असल्याचे सांगितले. त्यावेळी लागलीच खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून तालुक्यातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. तर राहिलेल्या पिकांचे फेर पंचनामे करावेत अशाही सूचना दिल्या. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची खासदारांना उत्तर देताना भांबळ उडाल्याचे दिसून आले.

यावेळी कृषी अधिकाऱ्यांना खासदार व शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच नुकसानीचे पंचनामे झालेलेचा आढावाही घेणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महेश चिवटे, अफसर जाधव, राजकुमार पाटील, शाम शिंधी, मोहन शिंदे, नरेंद्र ठाकूर, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, राजेश शिंदे, नानासाहेब ईवरे, अभिजीत मुरूमकर, विनोद इंदलकर, दादा पाठक, सागर शेळके, तसेच तहसीलदार समीर माने, सहायक गटविकास अधिकारी भोंग, एस. जे. पोळके, व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...