आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस नव्हे, हे तर राज्यामधील 'फसवणूक' सरकार; खासदार सुप्रिया सुळे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राज्यातील भाजप- शिवसेनेचे च्या सरकारने शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवरायांच्या नावाने करून पती-पत्नीला ऑनलाइन उभे केले असून कुणाचीही कर्ज माफी झालेली नाही. ही तर फडणवीस नव्हे फसवणूक सरकारने केलेली फसवणूक असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंदखेडराजा येथील नगर परिषदेच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात व्यक्त केला. 

 

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डाॅ.ए. पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेची व जिजामाता राजवाड्या समोरील खुल्या प्रांगणातील व्यायाम शाळेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले व जिजाऊ माँ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या सरकारच्या काळात बेरोजगारी महागाई वाढली असून जिजाऊ माँ साहेबांच्या जन्म स्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या जाहिरातीसाठी ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु जिजाऊ जन्म स्थळाच्या विकासासाठी शब्द दिलेले ३११ कोटी रुपये अद्यापही दिलेले नाहीत. नुसत्या घोषणा देण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे.

 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जिजाऊ जन्मस्थळ आदी विविध महापुरुषांच्या ऐतिहासिक स्थळी विकासाच्या नावाने घोषणा करण्याचेच काम हे सरकार करत आहे. असा आरोपही त्यांनी या वेळी केला. या वेळी डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी जिथे भाजपची सत्ता आहे. तिथेच हे सरकार निधी देते. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतील स्थानिक स्वराज्य संस्थाना निधी न देता दुजाभाव करत असल्याचे ते म्हणाले. तर आमदार राजेश टोपे यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती आरोप करत आपला रोष व्यक्त केला. या वेळी प्रास्तविकातून नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहा दिवस चाललेल्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिम नवाज राही यांनी केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष सीमा शेवाळे, मुख्याधिकारी एच. डी. वीर यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...