आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट, आज संध्याकाळी साडेचार वाजता मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समाजाच्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे

मुंबई- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट घेतली. 
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी विविध मागण्यांवर आंदोलकांनी चर्चा केली.

मराठा समाजाच्या अनेक मागण्यासाठी मराठा समाजाचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलन ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. अखेर सात दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलकांच्या भेटीनंतर आज संध्याकाळी साडेचार वाजता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजीराव जोंधळे आणि दोन्ही पक्षांचे वकील व बैठकीला आंदोलनातील सहभागी चार समन्वयक देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...