पीएसआय परीक्षेत बीडचा / पीएसआय परीक्षेत बीडचा विष्णुपंत तिडके प्रथम  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला

प्रतिनिधी

Mar 09,2019 09:39:00 AM IST
औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील विष्णुपंत भगवान तिडके हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमीत कल्लाप्पा खोत हे राज्यातून प्रथम तर महिला वर्गवारीतून धुळे जिल्ह्यातील अश्विनी सुभाष हिरे या गुणानुक्रमे प्रथम आल्या आहेत. एकूण ६५० पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
X
COMMENT