political / आबांच्या पत्नी सुमनताईंना मिसेस आठवले देणार आव्हान

सांगलीतील तासगाव मतदारसंघ म्हणजे आबांचा बालेकिल्ला

प्रतिनिधी

Sep 11,2019 08:38:00 AM IST

सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी, आमदार सुमनताई पाटील यांच्या विराेधात तासगाव- कवठे महांकाळ मतदारसंघातून लढण्याची तयारी रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी दर्शवली आहे.


सांगलीतील तासगाव मतदारसंघ म्हणजे आबांचा बालेकिल्ला. २०१४ च्या निवडणुकीतही ते िवजयी झाले. मात्र त्यांचे निधन झाले अन‌् पाेटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमनताईंची उमेदवारी निश्चित मानली जाते. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते संजयकाका पाटील यांनी भाजपात प्रवेश करून २०१४ मध्ये सांगलीची खासदारकी मिळवली. आता त्यांच्या पत्नी ज्याेती पाटील यांनी भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लाेकसभा निवडणुकीपासूनच त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या दाेघींत मुख्य लढत हाेण्याचा अंदाज आजवर वर्तवला जात हाेता. मात्र आता अचानक सीमा आठवले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने रंगत वाढली आहे.

X
COMMENT