आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस मुख्यमंत्रीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते झाले घायाळ, लूक बघून तुम्हीही म्हणाल 'एकदम झक्कास...' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतं. सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली आहे. 

अमृता ही खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे. नुकतंच अमृताने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोजवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः वर्षाव होतोय. चाहते अमृताच्या या लूकवर घायाळ झाले आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेमुळे अमृताचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकतंच या मालिकेने 100 भागांचा यशस्वी टप्पा पार केला.

बातम्या आणखी आहेत...