आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चिमुकलीला ओळखलंत का तुम्ही! टीव्ही स्क्रिनवर 'गाव की छोरी' दिसणारी खासगी आयुष्यात आहे ग्लॅमरस 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  वरील छायाचित्रात दिसणा-या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का... बरोबर ही आहे सुमी... सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून सुमी दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सूमी अर्थातच अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा वाढदिवस आहे.  अमृताने वयाची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 ऑक्टोबर 1997 रोजी अमृता जन्म झाला असून ती मुळची कोल्हापूरची आहे. पुण्यात तिने शिक्षण पूर्ण केले. 

'लागिरं झालं जी'साठी दिली होती ऑडिशन...
अमृताने 'लागिरं झालं जी' या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण काही कारणास्तव तिला ही मालिका मिळाली नाही. काही महिन्यांनी तिला 'मिसेस मुख्यमंत्री'साठी विचारणा झाली. या भूमिकेसाठी तिने रितसर ऑडिशन दिली आणि तिची निवड सुमी या मुख्य भूमिकेसाठी दिली. मधल्या काळात अमृताने तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अमृता कथ्थक नृत्यांगणादेखील आहे. 

बातम्या आणखी आहेत...