आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर-सुमीची पहिली मकरसंक्रांत, काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यात सुंदर दिसली सुमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतं. सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अमृताने साकारलेली सुमी ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. 

आता मकरसंक्रांतीचा सण आला आला आहे. समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्याने मामी आणि घरातील सगळी मंडळी हा सण दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी सुमी हलव्याचे दागिने घालून नटलेली प्रेक्षकांना दिसणार आहे. हलव्याच्या दागिन्यांमुळे सुमीचे सौंदर्य अगदी खुलून आलंय. समर आणि सुमीच्या चेह-यावर आनंदही ओसंडून वाहताना दिसतोय. सुमीने घरातील सर्व सुवासिनींना हळदी-कुंकू लावून हा सण साजरा केला. पण तिच्या सासूबाई मात्र नेहमीप्रमाणे तिच्यावर नाराजच दिसत आहेत. 'मिसेस मुख्यमंत्री'चा हा मकरसंक्रांती स्पेशल भाग लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी पाहुयात 'मिसेस मुख्यमंत्री'च्या सेटवरील मकर संक्रांतीची ही काही खास क्षणचित्रं.

बातम्या आणखी आहेत...