आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mrunal Thakur Gets Another Big Movie After 'jersey' With Shahid, Now Will Seen With Siddharth Malhotra

शाहिदसोबत 'जर्सी' नंतर मृणाल ठाकूरला मिळाला आणखी एक मोठा चित्रपट, सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'सुपर-30' आणि 'बाटला हाउस' यांसारख्या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. ती लवकरच सुपरहिट तमिळ चित्रपट 'थाडम' च्या हिंदी रीमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार आहे. या चित्रपटात ती एका पोलिस ऑफिसरचा  रोल साकारणार आहे, तसेच सिद्धार्थचा यामध्ये डबल रोल असेल. मर्डर मिस्ट्रीवर आधारित या थ्रिलर चित्रपटाची घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला केली गेली होती. 

'थाडम' च्या हिंदी रीमेकचे नाव सध्या ठरलेले नाही आणि याची रिलीज डेट 20 नोव्हेंबर ठरवली गेली आहे. हा चित्रपट टी-सीरीजचे भूषण कुमार आणि मुराद खेतानी मिळून प्रोड्यूस करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग मेमध्ये सुरु होईल आणि याचे जास्तीत जास्त शूटिंग दिल्लीमध्ये होईल. हा चित्रपट सत्य घटनेने प्रेरित असेल. 

मृणालकडे दोन मोठे चित्रपट.... 

मृणालने अशातच 'आंख मिचौली' यांचित्रपटाचे शूटिंग संपवले आहे आणि यानंतर तिने मे आणि जूनच्या सर्व तारखा 'थाडम' च्या रीमेकसाठी दिल्या आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त तिच्याकडे दोन मोठे चित्रपट आहेत आणि ज्यांपैकी एक शाहिद कपूरच्या अपोझिट 'जर्सी' आहे, तर दुसरा राकेश ओमप्रकाश मेहराचा चित्रपट 'तूफान' आहे, ज्यामध्ये ती फरहान अख्तरच्या अपोझिट दिसणार आहे. 

सिद्धार्थ मल्होत्राने 4 मार्चला भूषण कुमार आणि मुराद खेतानीसोबत एक फोटो शेअर करत या चित्रपटाबद्दल सांगितले होते. त्याने लिहिले होते, 'दुहेरी संकट, भूषण कुमार, मुराद खेतानी आणि वरदान केतकर यांच्यासोबत या जबरदस्त मनोरंजक थ्रिलर चित्रपटाचा भाग बनण्यास खूप उत्साहित आहे. 20 नोव्हेंबर 2020 ला तुमच्याशी थिएटर्समध्ये भेट होईल.' चित्रपटाचा निर्माता भूषण कुमारनेदेखील ट्वीट करत लिहिले होते, 'मुराद खेतानीसोबत मिळून पुढचा चित्रपट बनावट आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा अभिनय करेल. सत्य घटनेने प्रेरित हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट मेमध्ये फ्लोअरवर जाईल आणि 20 नोव्हेंबर 2020 ला रिलीज होईल.'