आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीच व्यक्ती, स्थान वेगळं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मला तो देखणा उंचापुरा माणूस दुसऱ्या परिस्थितीत भेटायला हवा होता, शूर योद्धा होता. पण वेळ चुकली होती.’


१९७१च्या भारतपाक युद्धात एका पाकिस्तानी मेजरला आमनेसामने झालेल्या झटापटीत ठार करणारे भारतीय (निवृत्त) कर्नल वीरेंद्रकुमार साही यांचं हे विधान एका बातमीत वाचलं. ‘माझी बंदूक अचानक अडकली. मग मी त्याच्यावर झडप घातली आणि बंदुकीच्या दस्त्याने त्याला मारलं,’ गेल्या आठवड्यात या युद्धात सहभागी झालेल्या जवानांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘या झटापटीनंतर आम्हाला त्याची काही कागदपत्रं सापडली, त्याने त्याच्या पत्नीला लिहिलेलं परंतु टपालात न टाकलेलं पत्र मिळालं. आम्ही ते सगळं सन्मानपूर्वक पाकिस्तानात पाठवलं. त्यासोबत मी तो कसा शूर होता, आणि नेटाने लढला याचं वर्णन करणारं मानपत्रही पाठवलं. तो मला वेगळ्या परिस्थितीत भेटायला हवा होता, असं मला राहून राहून वाटतं,’ असं ते म्हणाले.
असं आपल्यालाही वाटतं अनेकदा. कित्येक नाती अशी असतात की ज्यांच्यामध्ये अकारण पूर्वग्रह घुसलेले असतात. उदा. नणंदभावजय, सासूसून, वगैरे. या दोघींचं एकमेकींशी पटत नाही, त्या एकमेकींना पाण्यात पाहतात, त्या प्रेमाने नीट राहूच शकत नाहीत, अशी मुलींची समजूत लहानपणापासून करून दिलेली असते. किंवा मुली आपल्या घरात असं वागणाऱ्या स्त्रिया पाहात मोठ्या होतात त्यामुळे त्यांना जेव्हा नणंद मिळते fकंवा सासू मिळते तेव्हा ते नातं अशा बिनबुडाच्या गैरसमजापासून सुरू होतं. कधी ते त्यातनं सावरतंही, परंतु अनेकदा ते बिनसलेलंच राहातं. अशा वेळी आपण विचार करायला हवा की, माझी नणंद माझी शेजारीण म्हणून वा कार्यालयीन सहकारी म्हणून माझ्या आयुष्यात आली असती तर? तर आपलं नातं काही वेगळ्या पद्धतीने फुललं असतं का? केवळ ती नणंद आहे म्हणून मी तिच्याशी हातचं राखून वागतेय का, तिच्या प्रत्येक कृतीत काहीतरी खुसपट शोधतेय का, असा विचार केला तर कदाचित हे नातं आनंददायी होईलही.
इथे नणंदभावजय किंवा सासूसून असा उल्लेख केलाय म्हणून पुरुषांनी असा विचार करायलाच नको, असं सुचवायचं नाहीये. पुरुषांमध्येही हेवेदावे असतातच. फक्त ती नाती अशी पूर्वग्रहदूषित नसतात फारशी.
व्यक्ती तीच, स्थान वेगळं हा न्याय लावून पाहाणं रंजक ठरेल यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...