धोनीच्या गावात होती / धोनीच्या गावात होती टीम इंडिया, पत्नी साक्षीने दिली पार्टी, स्वतः ड्राइव्ह करून सहकाऱ्यांना घरी घेऊन गेला माही

Mar 07,2019 02:54:00 PM IST
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा वनडे सामना 8 मार्च रोजी रांचीत खेळला जात आहे. यासाठी टीम इंडिया धोनीच्या रांचीत पोहोचली आहे. धोनीच्या मूळ शहरात येताच टीम इंडियाने धमाल मस्ती केली. अख्ख्या टीमसाठी धोनीने आणि पत्नी साक्षीने पार्टी आयोजित केली. या निमित्त धोनी स्वतः सर्व टीम मेंबर्सला गाडीत बसवून आणि गाडी स्वतः ड्राइव्ह करून घेऊन गेला. हमरमध्ये टीमच्या सदस्यांना बसवून तो त्यांना आपल्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. या ठिकाणी साक्षीने अतिशय सुंदररित्या डिनर टेबल सजवले होते. टेबलांवर कॅन्डल डेकोरेट करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, साक्षी एक हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. साक्षीचे हे मॅनेजमेंट टीमच्या सदस्यांना खूप आवडले. त्यापैकीच एक युजवेंद्र चहलने एक फोटो ट्विटरवर शेअर करताना 'थँक्यू साक्षी भाभी' असे लिहिले.
X