Viral Pic: धोनी अन् पत्नी साक्षीच्या साधेपणावर सोशल मीडिया फिदा! इंटरनेटवर व्हायरल होत आहे फोटो

दिव्य मराठी वेब टीम

Apr 10,2019 04:17:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये चेन्नईत कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये सामना रंगला होता. यामध्ये चेन्नईने कोलकाताला 7 गडींनी पराभूत केले. याच सामन्यानंतर सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचा एक फोटो समोर आला. यामध्ये धोनी आणि साक्षी विमानतळावरच जमीनीवर आराम करताना दिसून आले. त्या दोघांनी बॅगेवर डोके ठेवले आणि झोप घेत होते.


आता धोनीचा संघ 11 एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई माधोपूर स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरोधात सामना खेळणार आहे. त्याच दिशेने जाताना सीएसके टीमला भल्या पहाटे रवाना व्हावे लागले. या दरम्यान धोनी आणि साक्षीला झोप आवरली नाही. काही वेळ त्यांनी विमानाची प्रतीक्षा केली. परंतु, त्यानंतर जमीनीवरच झोप लागली. धोनी आणि साक्षीच्या साधेपणाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीसह त्याच्या पत्नीचा फोटो एका टीम मेंबरने काढला होता. त्यानंतर स्वतः धोनीनेच तो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला शेकडो कॉमेंट आल्या आहेत. त्यातील सगळेच धोनी आणि साक्षीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

X
COMMENT