आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 0.08 सेकंदात धोनीने केली स्टंपिंग.. आऊट आहे की नाही, यावर विश्वासच बसेना.. मग असा हसला धोनी..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीने विद्युतवेगाने स्टंपिंग केली आणि जडेजाने आऊट आहे का असे विचारल्यानंतर धोनी असे हसला. - Divya Marathi
धोनीने विद्युतवेगाने स्टंपिंग केली आणि जडेजाने आऊट आहे का असे विचारल्यानंतर धोनी असे हसला.

मुंबई - महेंद्रसिंह धोनी हे नाव घेताच गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळते असे म्हणतात. पण तो जेव्हा स्टंपमागे असतो, तेव्हा फलंदाजही जरा घाबरूनच असतात. धोनी विकेटकिपर आहे आणि फलंदाज बिनधास्त पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो असे सहजासहजी होत नाही. कारण तुमची स्टंपिंग करायचा धोनीला एका सेंकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. हे उगाच बोलायचे म्हणून बोलणे नाही. त्याने यापूर्वी अनेकदा हे दाखवून दिले आहे. ब्रेबॉर्नवरील मंगळवारच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा हे अधोरेखित केले आहे. धोनीने विंडिच्या पॉलला अवघ्या 0.08 सेकंदामझ्ये स्टंपिंग करत माघारी धाडले. तो आऊट असेल यावर कोणालाही विशावसच बसत नव्हता. 

 

Reaction Time : 0.08 Seconds ⚡️

Stumping level : MSD 😎😎😎 and that smile in the end 👏 pic.twitter.com/GuxvmtIHff

— This is HUGE! (@ghanta_10) October 29, 2018

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विंडिजचा भारताने मोठा पराभव केला. भारताच्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना विंडिजचा डाव गडगडला होता. त्यात 28 व्या ओव्हरमध्ये जडेजा गोलंदाजी करत होता. तेव्हा विंडिजचा पॉल फलंदाजी करत होता. जडेजाचा एक चेंडू थोडा वळाला आणि पॉलला चकवून तो धोनीच्या हातात गेला. त्यावेळी पॉलचा पाय ख्रिसपासून तीन ते चार इंच बाहेर होता. धोनीने विद्युतवेगात चेंडू पकडला आणि पॉलची स्टंपिंग केली. एक सेकंदापेक्षा कमी वेळात म्हणजेच 0.08 सेकंदात हे सर्व घडले. त्यानंतर फलंदाज थेट पॅव्हेलियनकडे निघाला. 

 


जडेजा विचारत होता खरंच आऊट आहे 
हे सर्व एवढ्या कमी वेळात घडले आणि फलंदाजाचा पायही रेषेजवळच होता. त्यामुळे खरंच आऊट आहे, यावर लवकर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. जडेजाने तर धोनीला एक दोन वेळा खरंच आऊट आहे का असेही विचारले. पण फलंदाजाला सर्व माहिती होते, तो थेट परत निघाला होता. त्यात धोनी असा काही हसला की त्या हास्यामध्ये सर्वकाही होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...