आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने वेस्टइंडीज दौऱ्यातून घेतली माघार, पुढील दोन महिने भारतीय लष्करासोबत वेळ घालवणार- बीसीसीआय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)ने शनिवारी स्पष्ट केले की, महेंद्र सिंह धोनी वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार नाहीये. धोनी दोन महिने क्रिकेटपासून लांब राहणार आहे आणि तो हा वेळ पॅरामिलिट्री रेजिमेंटमध्ये घालवणार आहे. भारतीय संघाचा वेस्टइंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होईल. बीसीसीआय विंडीज दौऱ्यासाठी 21 जुलैला संघाची निवड करणार आहे. 

 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "धोनीने स्वथःहून विंडीज दौऱ्यावर जाणानर नसल्याचे सांगितले आहे आणि तो या वेळात पॅरामिलिट्री रेजिमेंटमध्ये घालवणार असल्याचे सांगितले. त्याने रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीच्या आधीच हा निर्णय घेतला.त्याने कर्णधार विराट कोहली आणि एमएसके प्रसादला याबाबत माहिती दिली आहे." धोनीच्या या निर्णयावरुन हे तरी सिद्ध होते की, सध्या तो निवृत्ती घेण्याच्या मुडमध्ये नाहीये.


धोनीला लेफ्टिनंट कर्नलचा रँक
धोनीला इंडियन टेरिटोरिअल आर्मीने 2011 मध्ये लेफ्टिनेंट कर्नलची रँक देण्यात आली आहे. धोनीचा मित्र मिहिरने सांगितले की, 'धोनीने वेस्टइंडीज दौऱ्यामधून स्वतःचे नाव मागे घेतले आहे. त्याने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली असून, तो आता लष्करासोबत वेळ घालवणार आहे."