Home | Sports | From The Field | MS Dhoni won 100th match as captain

सॅटनरच्या षटकाराने चेन्नईच्या सुपरकिंग्जचा सहावा विजय; धाेनीचे नेतृत्वात विजयी शतक

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 08:49 AM IST

चेन्नईची सुपर विजयाची मालिका कायम; रायडू, धाेनीची अर्धशतके

  • MS Dhoni won 100th match as captain

    जयपूर - सॅटनरच्या (नाबाद) षटकाराच्या बळावर गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यंदाच्या १२ व्या सत्रातील आयपीएलमध्ये सहाव्या विजयाची नाेंद केली. चेन्नई संघाने गुुरुवारी सातव्या सामन्यात यजमान राजस्थान राॅयल्सचा पराभव केला. चेन्नईने ४ गड्यांनी सामना जिंकला. धाेनीचे नेतृत्वात विजयाचे शतक झाले. ताे पहिला कर्णधार ठरला.

    प्रथम फलंदाजी करताना राजस्थाने ७ बाद १५१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने ६ गड्यांच्या माेबदल्यात १५६ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जची निराशाजनक सुरुवात झाली. शेन वाॅटसनसह (०), डुप्लेसिस (७), सुरेश रैना (४) हे तिघेही अपयशी ठरलेे. मात्र, त्यानंतर अंबाती रायडूने (५७) संघाचा डाव सावरला. त्याला कर्णधार धाेनीची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी चाैथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. रायडूला स्टाेक्सने बाद केले. त्याने ४७ चेंडूंत दाेन चाैकार अाणि तीन षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. धाेनीने अर्धशतक साजरे केले. त्याने ४३ चेंडूंमध्ये २ चाैकार व ३ षटकारांसह ५८ धावा काढल्या.

    जडेजाचे आयपीएलमध्ये विकेटचे शतक साजरे

    चेन्नई सुपरकिंग्जच्या गाेलंदाज रवींद्र जडेजाने गुरुवारी आयपीएलमध्ये विकेटचे शतक साजरे केले. त्याच्या नावे आता आयपीएलमध्ये १०० बळींची नाेंद झाली. त्याने १६१ सामन्यात हा पराक्रम गाजवला. त्याच्या नावे १६ धावा देत पाच बळी घेण्याची सर्वाेत्तम कामगिरी नाेंद आहे. त्याने २००८ मध्ये पदार्पण केले. त्याने आता राजस्थानविरुद्ध सामन्यात शानदार दाेन बळी घेतले.

Trending