आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण विभागाने विज कनेक्शन कट केले म्हणून 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी बनवली मिनी पवनचक्की

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची कमाल

दिनेश लिंबेकर

बीड- जिल्ह्यातील एक सरकारी शाळा आपल्या गरजेची वीज स्कतःच उत्पन्न करते. येथील कुर्ला गावातील जिल्हा परिषद शाळेने 25 हजार रुपयांचे विजेचे बील भरले नव्हते म्हणून महावितरणाने त्यांचे लाइट कनेक्शन कापले. त्यानंतर सातवीत शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी मिनी पवनचक्की बनवून आपल्या शाळेला विज पुरवठा केला. या पवनचक्कीमुळे सर्व शाळेत लाइट सुरू झाली.


विज्ञान विषयाचे शिक्षक भाऊ साहेब राणेने मुलांना पनवचक्की बनवण्यासाठी मदत केली. त्यांनी सांगितले की, या पनवचक्कीमध्ये सोलर यूनिट बसवली आहे. यातून 500 वॉट विज तयार होते. या पनवचक्कीला बनवण्यासाठी 5 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

शिकवत होतो, तेव्हाच मुलांनी प्रयोग करण्यास सांगितले

राणे सर पुढे म्हणाले की, शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच शिकवले जाते. एके दिवशी मी सातवीच्या वर्गावर पवनचक्की आणि त्यापासून होणारे फायदे सांगत होतो. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी मला हा प्रयोग शाळेसाठी करण्यास सांगितले आणि आम्ही पनवचक्की बनवली.

बातम्या आणखी आहेत...