अयोध्या वाद / बहुप्रतीक्षित अयोध्या वादावरुन अखेर पडदा उठणार आहे, उद्या सकाळी 10.30 पासून निकालाचे वाचन

40 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर हा निर्णय राखून ठेवला होता

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 09:36:44 PM IST

नवी दिल्ली- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतीक्षित अयोध्या वादावरून उद्या अखेर पडदा उठणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणावर आपला निकाल जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी 10.30 पासून निकालाचे वाचन करेल.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 16 ऑक्टोबर रोजी 40 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर हा निर्णय राखून ठेवला होता. तत्पूर्वी आज मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखणासाठी चर्चा केली.

प्रशासनाने लष्कराच्या 100 तुकड्यांची मागणी केली

अयोध्या जिल्ह्याला चार जोन- रेड, येलो, ग्रीन आणि ब्लूमध्ये विभागणी केली आहे. यात 48 सेक्टर बनवण्यात आले आहे. वादग्रस्त परिसर, रेड जोनमध्ये येतो. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्था अशाप्रकारे लावण्यात आली आहे की, एका कॉलवर संपूर्ण राज्याला सील करता येईल. प्रशासनाने निर्णय जवळ आल्यामुळे लष्कराच्या 100 तुकड्यांची मागणी केली.

X
COMMENT