आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Muharram 2018 : जाणून घ्या, कशामुळे साजरा केला जातो मोहरम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (20 सप्टेंबर, गुरुवार) मोहरम आहे.  इमाम हुसेन आणि त्यांच्या समर्थकांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोहरम साजरा केला जातो. हा उत्सव नसून दुःखाचा दिवस असतो. इमाम हुसेन पैगंबर मोहम्मद यांचे नातू होते. हा हिजरी संवत्सरातील पहिला महिला आहे. मोहरमच्या महिन्यात शिया मुस्लिम दहा दिवस हुसेन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक करतात. पण मोहरम का साजरा केला हे समजण्यासाठी आपल्याला मुस्लीम इतिहासात जावे लागेल. ज्या काळी इस्लाममध्ये खिलाफत म्हणजे खलिफाचे शासन होते, त्या काळात.


कोण आहेत शिया मुस्लीम?
इस्लाममध्ये संपूर्ण जगातील मुस्लीमांचा नेता म्हणजे खलिफा निवडण्याची पद्ध आहे. मोहम्मद पैगंबर हे चार वेळा खलिफा म्हणून निवडले गेले होते. लोक त्याकाळी आपसांत ठरवून योग्य व्यक्तीला प्रशासन, सुरक्षा यासाठी खलिफा निवडत असत. ज्यांनी हजरत अलीला इमाम (धर्मगुरू) आणि खलिफा निवडले ते शियाने अली म्हणजे शिया म्हटले जाऊ लागले. शिया म्हणजे हजरत अली यांचे समर्थक. त्याउलट सुन्नी हे चारही खलिफांची निवड योग्य असल्याचे मानतात.


यजीदने स्वतःला बनवले खलिफा
मोहम्मद साहब यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सुमारे 50 वर्षांनंतर इस्लामी जगतामध्ये घोर अत्याचाराचा कालावधी आला. मक्कापासून दूर सिरियाचे गव्हर्नर यजीद यांनी स्वतःला खलिफा घोषित केले. यजीदची काम करायची पद्धत राजाप्रमाणे होती. तेव्हा इस्लामला त्याची सवय नव्हती. इस्लाममध्ये राजाची संकल्पना नाही. अल्लाह हा एकच बादशाह असे ते मानतात. मक्कामध्ये बसलेले पैगंबर मोहम्मद ते नातू इमाम हुसेन यांनी यजीदला खलिफा मानन्यास नकार दिला होती.


नाराज यजीदने दिला इमाम हुसेनचे शीर आणण्याचा आदेश...
सत्तेत येताच यजीदने मदिनाचे राज्यपाल वलीद पुत्र अतुवा याला फरमान पाठवले. इमाम हुसेनला बोलावून माझ्या आदेशाचे पान आणि इस्लामचे सिद्धांत सांगण्याचे त्या फरमानमध्ये लिहिले होते. त्याने ऐकले नाही तर इमाम हुसेनचे शीर कापून पाठवण्यास सांगण्यात आले.


वलीद पुत्र अतुवा ने 25 किंवा 26 रजब 60 हिजरी ला रात्रीच्या वेळी हजरत इमाम हुसेनला राजभवनात बोलावले. त्यांना यजीदचे फरमान सुनावण्यात आले होते. इमाम हुसेनने वलीदला म्हटले, मी एका व्यभिचारी, भ्रष्टाचारी आणि अल्लाहला न मानणाऱ्या यजीदची आज्ञा मी मान्य करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...