आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mukesh Ambani And Nita Ambani Wedding Rare Photos

ईशा अंबानीच्या शाही लग्नसोहळ्याची झलक पाहिली, पण 34 वर्षांपूर्वी तिच्या आईवडिलांच्या लग्नाचा कसा होता थाट, बघा खास PHOTOS

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्याची सहचारिणी नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी अलीकडेच उद्योगपती आनंद पीरामलसोबत विवाहबद्ध झाली.  12 डिसेंबर रोजी मुकेश अंबानींच्या अँटीलिया या निवासस्थानी ईशा-आनंद यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज समोर आले आहेत. या लग्नसोहळ्याला बॉलिवूड, उद्योग, राजकारण आणि देश-विदेशातील दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे 34 वर्षांपूर्वी मुकेश आणि नीता यांचेही लग्न अशाच थाटात झाले होते. धीरुभाई अंबानी यांनी त्यांच्या थोरल्या मुलाच्या लग्नात कुठलीच कसर शिल्लक ठेवली नव्हती. नीता-मुकेश यांचे अरेंज मॅरेज आहे. मात्र, त्याला 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' असेच म्हणता येईल. या रिचेस्ट दाम्पत्याची पहिली भेट कुठे झाली, मुकेश यांनी नीता यांना कशाप्रकारे प्रपोज केले, हे जाणून घेऊयात... 


धीरुभाईंना आवडला होता नीतांचा क्लासिकल परफॉर्म....
धीरूभाई अंबानी यांनी सगळ्यात आधी नीता यांना पाहिले. नीता एका डान्स प्रोग्राममध्ये क्लासिकल डान्स करत होत्या. तेव्हा धीरूभाईंना नीता यांच्या थोरली सून दिसली. धीरूभाईंनी नीता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून थोरला मुलगा अर्थात मुकेश यांच्यासाठी त्यांच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

 

मुकेश यांनी नीता यांना कसे केले प्रपोज?
मुकेश व नीता यांची पहिली भेट मुंबईत झाली. तेव्हा मुकेश यांनी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक परिधान केली होती. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. सुरुवात मुकेश यांनाच करावी लाकली होती. मुकेश म्हणाले, 'हाय, मुकेश अंबानी आहे. तू माझ्याशी लग्न करशील?'

 

नीता यांनी स्मीत हास्याने कळवला होकार... 
एकदा मुकेश आणि नीता कारमधून पेडर रोडवरून निघाले. तेव्हा संध्याकाळचे जवळपास साडेसात वाजले होते. रस्त्यावर फार वर्दळ होती. मुकेश यांची कार एका सिग्नलवर थांबली, तेव्हा मुकेश यांनी फिल्मी स्टाईलने नीताला प्रपोज केले होते. हाय मी मुकेश अंबानी. तू माझ्याशी लग्न करशील का?" हे ऐकून नीता लाजल्या. त्यांनी खाली पाहिले. मुकेश यांना गाडी चालवण्यास सांगितले. समोरील सिग्नल ग्रीन झाला होता. मागील वाहने हॉर्न वाजवत होत्या, मात्र, मुकेश म्हणाले, "जो पर्यंत तू उत्तर देत नाहीस, तोपर्यंत मी येथून हलणार नाही." बराच वेळ विचार करून शेवटी नीता यांनी स्मीत हास्य करत आपला होकार कळवला. त्या म्हणाल्या, "यस.. आय विल.. आय विल".

 

मुकेश यांनी मर्सिडिज सोडून नीता यांच्यासोबत बसने केला प्रवास...

प्रेमासाठी काय पण, मुकेश यांनी त्यांची मर्सिडिज सोडून मुंबईत बेस्टच्या बसने नीता यांच्यासोबत प्रवास केला होता.

 

लग्नानंतरही नोकरी करायच्या नीता अंबानी... 
मुकेश व अंबानी यांचा विवाह 1984 मध्ये थाटात पार पडला. विवाह समारंभात उद्योगासह बॉलिवूड व राजकारणातील दिग्गज उपस्थित होते.   मुकेश अंबानी यांच्याशी 1984 मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर नीता अंबानी एका खासगी शाळेत 800 रुपये पगाराची नोकरी करत होत्या, हे नीता अंबानी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. नीता यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, एका खासगी शाळेत नीता नोकरी करत होत्या. मात्र, नीता या मुकेश अंबानी यांची पत्नी आहेत, हे शाळेच्या प्राचार्यांना माहीत नव्हते. 1987 वर्ल्डकपचे स्पॉन्सर रिलायन्स ग्रुपने केले होते. प्राचार्यांनी दोन सामन्यांचे तिकिटे आणली होती. कोणतेही दोन शिक्षक सामने पाहायला जाऊ शकतात, असे प्राचार्यांनी सांगितले होते. तेव्हा नीता यांनी तिकिट घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. एका सामन्यादरम्यान नीता यांना प्रेसिडेंट बॉक्समध्ये व्हीआयपींसोबत पाहून प्राचार्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा त्यांनी माहिती काढली असता, नीता या देशातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब अंबानीची सून व मुकेश अंबानी यांची पत्नी असल्याचे प्राचार्यांना समजले.


पुढील स्लाईड्सवर बघा,  34 वर्षांपूर्वी कसा रंगला होता नीता-मुकेश अंबानींचा लग्नसोहळा...