आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mukesh Ambani Daughter Isha Ambani And Anand Piramal Engagement Special Dress Code

4 Unseen Pics: ईशापेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत आनंद पीरामल, एंगेज्मेंट पार्टीत पाहुण्यांसाठी असणार खास ड्रेस कोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत ईशाचे लग्न ठरले असून 21 सप्टेंबर रोजी इटली येथे दोघांचा साखरपुडा होणार आहे. तब्बल तीन दिवस येथे त्यांच्या साखरपुड्याची पार्टी रंगणार आहे. 

 

आठ वर्षांचे आहे दोघांत अंतर..
आनंद पीरामल यांनी महाबळेश्वर येथील एका मंदिरात ईशाला लग्नाची मागणी घातली होती. याचवर्षी मे महिन्यात दोघांचे लग्न ठरले. तसं पाहता अंबानी आणि पीरामल यांचे 40 वर्षे जुने मैत्रीचे नाते आहे. ईशा आणि आनंद हेदेखील अनेक वर्षांपासून मित्र आहेत. या दोघांनी मैत्रीचे रुपांतर लग्नात करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद आणि ईशा यांच्या आठ वर्षांचे अंतर आहेत. ईशा 26 वर्षांची तर आनंद 33 वर्षांचे आहेत. 

 

इटलीतील लेक कोमो येथे तीन दिवस चालणार सेलिब्रेशन... 
ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी अंबानी आणि पीरामल कुटुंबीयांकडून जंगी सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली आहे. या खास सोहळ्यासाठी त्यांनी इटलीतील नयनरम्य ठिकाण असलेल्या लेक कोमोची निवड केली आहे. येथे तीन दिवस हे सेलिब्रेशन सुरु राहणार असून वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी पाहुण्यांना खास ड्रेस कोड फॉलो करावा लागणार आहे.

 

शुक्रवार, 21 सप्टेंबर - 

21 सप्टेंबर या पहिल्या दिवशी लंचला पाहुण्यांना कॅज्युअल ड्रेसअप फॉलो करावा लागेल. संध्याकाळी डिनर पार्टीत ब्लॅक टाय हा ड्रेस कोड आहे. ब्लॅक टायचा अर्थ ब्लॅक कोट, पँटसोबत व्हाइट शर्ट आणि ब्लॅक टाय परिधान करावा लागेल. 

 

शनिवार 22 सप्टेंबर

दुस-या दिवशी 'Italian Fiesta' मध्ये पाहुण्यांना Como Chic लूक फॉलो करावा लागेल. डिनरसाठी संध्याकाळी पाहुणे कॉकटेल अटायरमध्ये असतील.


रविवार 23 सप्टेंबर

रविवारी होणा-या फेअरवेल लंचमध्ये पाहुण्यांना स्मार्ट कॅज्युअल ड्रेस कोड फॉलो करावा लागेल.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, ईशा आणि आनंद यांचे  Unseen Photos... 

बातम्या आणखी आहेत...