आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज आहे मुकेश अंबानींची लेक ईशाचा साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे आनंद पीरामल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचे लग्न ठरले असून आनंद पीरामल हे तिच्या भावी पतीचे नाव आहे. आज म्हणजे 21 सप्टेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे दोघांचा साखरपुडा होणार आहे. तब्बल तीन दिवस लेक कोमा येथे साखरपुड्याचा जल्लोष सुरु राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहतासोबत झाला होता. असे म्हटले जात होते की, ईशापूर्वी आकाशचे लग्न होईल. पण व्होगच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी मुलगा आकाशपूर्वी मुलगी ईशाचे लग्न करणार आहेत. अंबानी कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झाली आहे. अर्थातच मुलीची पाठवणी केल्यानंतर मुकेश आणि नीता अंबानी सूनबाईंचे स्वागत करणार आहेत. ईशा अंबानी ज्या व्यक्तीसोबत साता जन्माच्या गाठीत अडकणार आहे, तो कोण आहे जाणून घेऊयात... 

 

कोण आहे आईनंद पीरामल
* आनंदचे वडील अजय पीरामल प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी पीरामल रियल्टीचे संस्थापक आहेत.
* आनंद पीरामल या ग्रुपचा कार्यकारी संचालक आहे.
* आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रासाठी पीरामल स्वास्थ्यची स्थापना केली आहे.
* आनंद इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचा सर्वात कमी वयाचा अध्यक्ष राहिला आहे.
* आनंदने अमेरिकेतील पेंसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
* त्यानंतर त्याने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...