आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींची दररोज ३०० कोटी रुपयांची कमाई; एका वर्षात कंपनीच्या शेअरचे भाव ४५% वाढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मालमत्ता दररोज ३०० कोटी रुपयांनी वाढली आहे. बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट २०१८ नुसार मुकेश अंबानी ३ लाख ७१ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत सलग सातव्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. एका वर्षात त्यांच्या कंपनीच्या शेअरचे भाव ४५% वाढले आहेत. 


यादीत दुसऱ्या स्थानावरील ए.पी. हिंदुजा (१.५९ लाख कोटी), तिसरे एल.एन.मित्तल (१.१४ लाख कोटी) आणि चौथ्या क्रमांकावरील अझीम प्रेमजी (९६,१०० कोटी) या सर्वांच्या एकूण मालमत्तेपेक्षा मुकेश अंबानींची मालमत्ता जास्त आहे. सन फार्माचे दिलीप सिंघवी (८९,७०० कोटी) पाचव्या तर सहाव्या स्थानी कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक (७८,६०० कोटी) आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे गौतम अदानी (७१,२०० कोटी) आठव्या स्थानी आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...