आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्टला मोठा Surprize देणार अंबानी: 3 महिने फुकटात 600 हून अधिक HD चॅनल्स! घरबसल्या अशी करा नोंदणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - सुपरफास्ट 4G मोबाईल इंटरनेटसह टेलीकॉम सेक्टरमध्ये क्रांती आणणारी कंपनी रिलायन्स Jio आता ब्रॉडबँडच्या जगतात खळबळ माजवण्याच्या तयारीत आहे. Jio ने फायबर बेस्ड ब्रॉडबँड सेवा Jio Gigafiber साठी रेजिस्ट्रेशन (नोंदणी) ची सुरुवात 15 ऑगस्टपासून होत आहे. यासोबतच एचडी क्वालिटीचे 600 हून अधिक चॅनल सुद्धा दाखवले जाणार आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, रेजिस्ट्रेशन करणाऱ्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. जिओ मार्केटमध्ये येताच अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या एअरटेल, बीएसएनएल, एमटीएनएल, एसीटी फायबरनेट, स्पेक्ट्रासह असंख्य खासगी कंपन्यांना तगडी टक्कर मिळणार आहे. कंपनीने काही शहरांमध्ये सेवेचा ट्रायल देखील सुरू केला आहे. 


3 महिने फुकटात वापरा!
जिओ गीगाफायबर ब्रॉडबँड कनेक्शन ग्राहकांना मोफत दिला जाणार आहे. कंपनी यासाठी इंस्टॉलेशन चार्जेस घेऊ शकते. तरीही एखादा ग्राहक ही सेवा सोडू इच्छित असल्यास त्याला तो चार्ज देखील रीफंड केला जाणार आहे. कंपनीने सुरुवातीचे 3 महिने ही सेवा मोफत देण्याची तयारी केली आहे. जिओ गीगाफायबरसह DTH कनेक्शन सुद्धा दिला जाईल. यात ग्राहकांना स्मार्ट होम सुविधा मिळणार आहे. 


ग्राहकांना देणार 2 प्रकारच्या सेवा
- जिओ गीगाफायबर अंतर्गत दो सेवा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये जिओ गीगाफायबर राउटर आणि जियो गीगाटीव्ही सेट टॉप बॉक्स अशा दोन गोष्टींचा समावेश आहे.  
- जियो गीगाफायबर राउटरने ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट सेवा देणार आहे. हा राउटर मल्टिपल डिव्हाइस म्हणून काम करेल. या राउटरने ग्राहकांना 1GB (1000MB) प्रति सेकंद इतकी इंटरनेट स्पीड मिळेल.
- सेटटॉप बॉक्स टीव्हीसाठी असेल. जिओने आपल्या 41 व्या वार्षिक महासभेत यासंदर्भातील घोषणा केली होती. ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून यूजर्सला टेलिव्हिजनवर व्हिडिओ कॉल सुद्धा करता येईल. 


असे करा रेजिस्ट्रेशन
आपण MyJio app आणि Jio.com यापैकी कुठल्याही एका ठिकाणी लॉग इन करून नोंदणी करू शकता. या नोंदणीसाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. या दोन्ही प्रक्रियेतून आपल्याला घरबसल्या नोंदणी करता येईल.


इंस्टॉलेशनसाठी किती चार्ज?
इंस्टॉलेशनसाठी किती खर्च करावा लागेल याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती जारी केली नाही. तरीही कंपनीकडून 4500 रुपये आकारले जातील अशी मार्केटमध्ये चर्चा आहे. यातही महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना सेवा आवडली नसेल किंवा कुठल्याही कारणावरून ती सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास ही रक्कम ग्राहकांना परत दिली जाणार आहे. 


कोणत्या शहरांमध्ये मिळेल कनेक्शन?
सध्या देशभरातील 1100 शहरांमध्ये रेजिस्ट्रेशन केले जाणार आहे. ज्या शहरांमध्ये सर्वाधिक रेजिस्ट्रेशन होतील त्या शहरांत प्राधान्य देऊन आधी कनेक्शन दिले जाईल. कंपनी आपल्या या सेवेसाठी 5 प्लॅन लाँच करणार आहे. त्याची किंमत मासिक 500 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत असू शकते.

बातम्या आणखी आहेत...