फोर्ब्ज यादी / मुकेश अंबानी जगात नववे श्रीमंत, गुगल संस्थापकास टाकले मागे

  • फोर्ब्जच्या रिअल टाइम बिलेनियर यादीत पेज दहाव्या क्रमांकावर
  • रिलायन्स १० लाख कोटी रु.चे भांडवल असणारी देशातील पहिली कंपनी

प्रतिनिधी

Nov 30,2019 09:39:15 AM IST

​​​​​​नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल)चे चेअरमन मुकेश अंबानी गुरुवारी जगातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी गुगलचे संस्थापक लॅरी पेज(४६) आणि सर्गे ब्रिन(४६)ला मागे टाकले आहे. फोर्ब्जच्या जगातील अब्जाधीशांच्या रिअल टाइम लिस्टनुसार अंबानींचे नेटवर्थ ६०७० कोटी डॉलर(४.३३ लाख कोटी रु.) आहे. पेज ४.२५ लाख कोटी रुपये नेटवर्थसह १० वे आणि ब्रिन ४.१० लाख कोटींसह ११ व्या क्रमांकावर आहेत.मुकेश अंबानी आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी गेल्या वर्षी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले होते.


फोर्ब्जनुसार जगातील टॉप अब्जाधीश

नाव कंपनी नेटवर्थ(रुपये)
जेफ बेजोस अॅमेझॉन 8 लाख कोटी
बर्नार्ड अरनॉल्ट फॅमिली एलव्हीएमएच 7.67 लाख कोटी
बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट 7.66 लाख कोटी
वॉरेन बफे बर्कशायर हॅथवे 6.20 लाख कोटी
मार्क झुकेरबर्ग फेसबुक 5.34 लाख कोटी
कार्लोस स्लिम फॅमिली अमेरिका मोविल 4.34 लाख कोटी
मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज 4.33 लाख कोटी
लॅरी पेज गुगल 4.25 लाख कोटी

X
COMMENT