आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mukesh Ambani Reliance Industries Share Price Today News Updates On RIL Market Cap

शेअर बाजारात मुकेश अंबानींच्या रिलायंसला 12 वर्षातील सर्वात मोठे नुकसान, शेअर्स 13% घसरल्याने गुंतवणुकदारांचे 1.08 लाख कोटी बुडाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेंसेक्स 1941 अंकानी कोसळला, त्यापैकी 500 अंक एकट्या रिलायंस इंडस्ट्रीकडे
  • रिलायंस इंडस्ट्री आणि ओएनजीसीचा मार्केट कॅप एक-एक लाख कोटींनी कमी झाला
  • रिलायंसचा मार्केट कॅप आता 6.97 लाख कोटी आणि टीसीएसचा 7.31 लाख कोटींवर

बिजनेस डेस्क- शेअर बाजार कोसळल्याचा सर्वात मोठा फटका देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना बसला आहे. त्यांची कंपनी रिलायंस इंडस्ट्रीला शेअर बाजारात 12 वर्षातील सर्वात मोठे नुकसान झाले आहे. रिलायंस इंडस्ट्रीचे शेअर 13% कोसळून 1105 रुपयांवर आले आहेत. हे ऑक्टोबर 2008 नंतर झालेली सर्वात मोठी घट आहे. यामुळे रिलायंस इंडस्ट्री लिमिटेडचे मार्केट कॅप 6.97 लाख कोटी रुपये झाले आहे. कंपनीच्या शेअर धारकांनी सोमवारी 1.08 लाख कोटी रुपये गमावले. सेंसेक्स 1941 अंकांनी कोसळला, त्यापैकी अंदाजे 500 अंक एकट्या रिलायंस इंडस्ट्रीचे आहेत. मार्केट कॅपबाबतीत रिलायंस आता टीसीएसच्या मागे आहे. टीसीएसचे मार्केट कॅप 7.31 लाख कोटी रुपये आहे. तर, सरकारी कंपनी ओएनजीसीचे शेअर 15 पर्सेंटपर्यंत कमी झाले आहे. याचे मार्केट कॅपदेखील 1 लाख कोटी रुपये कमी झाला आहे.

येस बँकेचे शेअर 32 टक्क्यांनी वाढून 21.30 रुपयांवर आले आहेत


कोरोना व्हायरस आणि येस बँकेमुळे शेअर मार्केट सोमवारी कोसळले. गुंतवणुकदारांमधील भीतींमुळे सेंसेक्स 2,000 अंकांपेक्षा कमी आहे, तरीदेखील येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालिची गती आली आहे. बीएसईवर येस बँकेचे शेअर 32 टक्क्यांनी वाढून 21.30 रुपयांवर आले आहेत. शुक्रवारी बीएसईवर येस बँकेचे शेअर्स 16.20 रुपयांवर बंद झाले. बँकेतील ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याच्या सरकारच्या आश्वासनानंचर ग्राहकांमध्ये थोडी सुरक्षितता आली आहे. पण, या बँकेला वाचवण्यासाठी पुढे आलेली देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे शेअर्स पडले आहेत. एसबीआयचे शेअर सोमवारी 5.60% कमी होऊन 254 रुपयांवर पोहचले. शुक्रवारी बीएसईवर येस बँकेचे शेअर 260 रुपये होते.

रिलायंसचा मार्केट कॅक दोन महिन्यांपूर्वी 10 लाख कोटींपेक्षा जास्त होता

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंसचा मार्केट कॅप सोमवारी 1 लाख कोटींपेक्षा कमी झाला. दोन महीन्यांपूर्वी रिलायंसचा मार्केट कॅप 10 लाख कोटींपेक्षाही जास्त होता. आता कंपनीचा मार्केट कॅप 7 लाख कोटींपेक्षाही कमी झाला आहे. कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांनी कमी होऊन 1,105 रुपयांवर आले आहेत.

2020 मध्ये सेंसेक्स 2 महीन्यात 12.53% कोसळला


2020 मध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत सेंसेक्स अंदाजे 12.53% कोसळला आहे. 1 जानेवारीला सेंसेक्स 41,306 अंकांवर होता. 9 मार्चला सेंसेक्स 36,128 अंकांवर आला. यानुसार आता सेंसेक्स 5,178 अंकांनी कमी झाला आहे. याप्रकारेच निफ्टी 1,602 अंकांनी कोसळली आहे. 1 जानेवारीला निफ्टी 12,182 अंकांवर होती. 9 मार्चला निफ्टी 10,580 अंकांवर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...