आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी यांच्या मुलाचा आज विवाह.. मुंबईतील 50000 पोलिस कर्मचार्‍यांना पाठविली मिठाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे च‍िरंजीव आकाश आज (9 मार्च) लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विवाहाच्या आधी अंबानी यांनी मुंबईतील 50 हजार पोलिस कर्मचार्‍यांना मिठाईचे बॉक्स पाठविले. मुंबई महानगरातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये मिठाईचे बॉक्स म‍िळाले आहे.

 

आकाश (28) आणि श्लोका मेहता (28) अाज विवाहाच्या बंधनात बांधले जातील. श्लोका ही हीरे व्यापारी रसेल मेहता आणि मोना मेहता यांची कन्या आहे. एका पोलिस कर्मचार्‍याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, मला पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर एक मिठाईचा बॉक्स मिळाला. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचे हे गिफ्ट असल्याचे इतर सहकार्‍यांनी सांगितले. 'आकाश आणि श्लोकाच्या विवाह समारंभाला आम्हाला आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अपेक्षीत आहेत.' असे संदेश प्रत्येक बॉक्सवर लिहिला आहेे. खाली विनित म्हणून नीता-मुकेश अंबानी, ईशा-आनंद आणि अनंत यांची नावे आहेत.

 

2000 अनाथ मुले आणि वृद्धांना अन्नदान..
मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुंबईतील 2000 अनाथ मुले आणि वृद्धांना अन्नदान केले. यावेळी आकाश आणि श्लोका यांनी मुलाना वाढले. दरम्यान, मुकेश आणि नीता यांनी कन्या ईशाच्या विवाहाच्या आधी देखील अन्नदान केले होते. राजस्थानमधील उदयपूरमध्ये अंबानी यांनी 5000 हून जास्त नागरिकांना अन्नदान केले होते.

 

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होईल विवाह..
आकाश आणि श्लोका यांचा विवाह मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, वरात ट्राइडेंट हॉटेलमधून निघेल. 7 वाजून 30 मिनिटांचा विवाह मुहुर्त आहे. 11 मार्चला रिसेप्शन आहे.

बातम्या आणखी आहेत...