Home | Maharashtra | Mumbai | mukesh ambani son akash ambani shloka mehta wedding card is unlike anything you have seen

Wedding Card.. आकाश अंबानींची लग्नपत्रिका राधा-कृष्णाच्या थीमवर आधारित, बॉक्स उघडताच ऐकू येते भजन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 03:46 PM IST

अंबानी कुटुंबाने राधा-कृष्णची प्रतिमा प्रत्येक पाहुण्याला पत्रिकेसोबत गिफ्ट केली आहे.

 • मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे चिरंजिव आकाश अंबानी यांचा विवाह 9 मार्च रोजी होणार आहे. आकाश हे श्लोका मेहता यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. मुंबई येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा विवाह समारंभ पार पडणार आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ समोर आला आहे.

  लग्न पत्रिका एका बॉक्सच्या आकारात आहे. वेडिंग कार्डमध्ये अॅनिमेटेड लाइटिंग डिस्क बसवलेली आहे. सेंटरमध्ये राधा-कृष्णाची प्रतिमा दिसते. अंबानी कुटुंबाने राधा-कृष्णची प्रतिमा प्रत्येक पाहुण्याला पत्रिकेसोबत गिफ्ट केली आहे. परंपरेनुसार अंबानी कुटुंबाने पहिले निमंत्रण सिद्धिविनायक मंदिराला दिले आहे.

  वेडिंग कार्डमध्ये नीता-मुकेश यांची स्वाक्षरी असलेला शुभ संदेश

  आकाश आणि श्लोका यांच्या लग्न पत्रिका राधा-कृष्णाच्या थीमवर आधारित आहे. बॉक्स उघडताच 'अच्युतम केशवम्, कृष्ण दामोदरम्' भजनाची धून वाजते. कार्डच्या दर्शनीभगात विघ्नहर्ता गणपती दिसतो. आत विवाह मुहुर्त तर लग्न पत्रिकेत नीता आणि मुकेश अंबानी यांची स्वाक्षरी असलेला शुभ संदेश दिसतो.

  पत्रिकेत राधा-कृष्णाच्या लीलांची विविध छायाचित्रे आहेत. पिवळे, गुलाबी, निळे, हिरवे, पांढरे लाल रंग पत्रिकेत वापरण्यात आली आहेत.


  दरम्यान, मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्या लग्नपत्रिकेची किंमत 3 लाख रुपये होती. ईशा यांचा विवाह डिसेंबर 2018 मध्ये आनंद पीरामल यांच्याशी झाला होता.

  पुढील स्लाइड्‍स क्लिक पाहा.. संबंधित ‍व्हिडिओ आणि फोटो..

Trending