आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकेश अंबानी 3.65 लाख कोटी रुपयांसह श्रीमंत भारतीयांत अव्वल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी श्रीमंत भारतीयांच्या फोर्ब्ज यादीत सलग बाराव्या वर्षी अव्वल आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ३.६५ लाख कोटी रु.(५१.४ अब्ज डॉलर) आहे. केवळ तीन वर्षे जुनी दूरसंचार युनिट जिओतून त्यांनी आपल्या नेटवर्थमध्ये २९ हजार कोटी रु.(४.१ अब्ज डॉलर) जोडले आहेत.

३४ कोटी ग्राहकांसोबत जिओ देशातील मोठी दूरसंचार कंपनी झाली आहे. फोर्ब्जनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे आव्हानात्मक वर्ष सुरू आहे. २०१९ च्या यादीत सहभागी श्रीमंतांची एकूण मालमत्ता गेल्या वर्षीच्या तुलनेत ८% रोडावत ३२ लाख कोटी रुपये(४५२ अब्ज डॉलर) झाली आहेे. भारताच्या १०० श्रीमंतांपैकी निम्म्याहून जास्त जणांची संपत्ती या वर्षी कमी झाली आहे. यासोबत सहा नवे लोकही फोर्ब्जच्या १०० जणांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. संदीप इंजिनीअर(९८ व्या स्थानी, १०.२० हजार कोटी रु., एस्टायल पोलिटेक्निक) यांनी यादीत स्थान मिळवले.

१८ क्रमांकाच्या उसळीसोबत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी
मासिकानुसार, आर्थिक मरगळीत अनेक उद्योग सम्राटांनी झेप घेतली आहे. पायाभूत क्षेत्रातील दिग्गज गौतम अदानी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ स्थानांची झेप घेत देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १.११ लाख कोटी रु. झाली आहे. नऊ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अदानींच्या ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीस परवानगी मिळाल्यानंतर ही वृद्धी मिळाली. अदानींनी विमानतळापासून डेटा केंद्रांपर्यंत आपला व्यवसाय विस्तार केला आहे. अंबानी अदानीनंतर हिंदुजा बंधू, पालनाजी मिस्त्री आणि बँकर उदय कोटक यांच्यात खूप कमी अंतराने खाली आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...