आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राच्या संगीत सेरेमनीत अडीच तास हजर होते अंबानी कुटुंबीय, रात्री 10 वाजता पोहोचले आणि 12.30 ला मुंबईला परतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपुरः उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मेंदीसोबत प्रियांकाची संगीत सेरेमनी झाली. दुपारी पूल साइडवर प्रियांकाच्या हातावर निकच्या नावाची मेंदी रचली. त्यानंतर रात्री संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी रात्री 10 वाजता चार्टर प्लेनने जोधपूरमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची कन्या ईशा, मुलगा अनंत आणि त्याची भावी पत्नी राधिका बोती. रात्री झालेल्या या संगीत सेरेमनीत कोरिओग्राफर गणेश हेगडे यांच्यासोबत प्रियांकाच्या चुलत बहिणी परिणीती चोप्रा आणि मनारा चोप्रा यांनी परफॉर्म केले. निक जोनासनेही प्रियांकासाठी स्पेशल परफॉर्मन्स दिला.

 

प्रोग्रामसाठी मुंबईहूनच तयार होऊन आले होते अंबानी, हसत दिल्या पोज...
एअरपोर्टवर पोहोचलेल्या अंबानी कुटुंबातील सदस्यांच्या चेह-यावर प्रियांकाच्या संगीत सेरेमनीचा आनंद स्पष्ट झळकत होता. नीता अंबानी व्हाइट लहेंग्यासोबत राणी कलरच्या ओढणीत दिसल्या. तर ईशासुद्धा इंडोे-वेस्टरन लूकमध्ये दिसली. राधिकाने सिल्क स्कर्टसोबत  नेव्ही ब्लू व्हेलवेट क्रॉप टॉप घातला होता. मुकेश अंबानी काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसले. संपूर्ण कुटुंबानी आनंदाने फोटोग्राफर्सला पोज दिल्या. उशीरा रात्री  12:30च्या सुमारास हे कुटुंब चार्टर प्लेनने मुंबईत परतले. 

 

बातम्या आणखी आहेत...