आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते. खासगी, सहकारी बँका, एटीएम, सोन्या-चांदीची दुकाने तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोखीचे व्यवहार चालतात, अशा ठिकाणी दरोड्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. बँका तसेच एटीएमसारख्या वर्दळीच्या ठिकाणी दरोड्यासारख्या घटना कधी घडतील याचा नेम नाही. बँकेत येणारे ग्राहक आणि कर्मचार्‍यांवर असुरक्षिततेची टांगती तलवार कायम आहे. अशा ठिकाणी शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची गरज असते. गृह विभागाच्या आदेशामुळे येथील सर्व शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांना विनाशस्त्र काम करावे लागत आहे. या आदेशानुसार सुरक्षा एजन्सीजना शस्त्रधारी सुरक्षा रक्षक ठेवण्याचा परवाना बंधनकारक केलेला आहे. तसेच बहुतेक सुरक्षा एजन्सीजना परवाना काढण्यासाठी अर्ज केलेले आहेत, परंतु गृह विभागाने अद्याप या प्रकरणाकडे लक्ष दिले नसल्याचे शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.