आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा सुरू आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. आता टीव्हीसमोर बसून ‘आयपीएल’ पाहणे हा मोठा खेळ? प्रत्यक्षात मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरात तर गल्लीत कधी तरी क्रिकेट खेळले जाते. त्यात घरांच्या काचा फुटतात. जुने खेळ इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत. आयपीएलला प्रचंड प्रतिसाद, महागडी तिकिटे, स्टेडियमपर्यंत जाणे-येणे, महागडे खाद्यपदार्थ, वेळ यांचा विचार करता या गोष्टी कोणाला परवडतात? दैनंदिन समस्यांनी हैराण लोक मात्र टीव्हीपुढे विरंगुळा म्हणून पाहतात. प्रचंड श्रीमंत खेळाडू, आयोजक, प्रायोजक; पण प्रेक्षकांची अवस्था काय आहे? त्याचबरोबर आपल्या देशी खेळांना लहान मुले विसरत चालली आहेत. पालकांनी आपले खेळ मुलांना ज्ञात करून द्यावेत.
पी. एम. काळे, ई-मेलद्वारे
बातम्या आणखी आहेत...