आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कारामागचे गुपित!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पाठवून दिला होता. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. त्यानुसार मुलाखतीसाठी मुंबईला कामगार कल्याण आयुक्तांकडे गेलो होतो. वैयक्तिक मुलाखती असल्याने इतर स्पर्धक बाहेर थांबले होते.

एका स्पर्धकाचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा मी त्याच्याकडे पाहिले. त्याचे नाव परिचित वाटले, शिवाय पेहराव पाहता तो आपल्या गावाकडील असावा, असाही माझा अंदाज होता. ती व्यक्ती मुलाखत संपताच निघून गेली. माझीही मुलाखत संपल्यानंतर सीएसटीला आलो. योगायोग असा की, त्याच व्यक्तीने दादरला माझ्या डब्यात प्रवेश केला. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. माझा परिचय करून दिल्यानंतर त्यांची ओळख विचारली. माझा अंदाज बरोबर निघाल्याने आम्हा दोघांनाही आनंद वाटला. त्यानंतर त्यांनी गमतीने माझ्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही धूम्रपान करता का? तंबाखू किंवा गुटखा खाता का? लांडीलबाडी करता का? या सर्व प्रश्नांची माझी उत्तरे नकारार्थी होती. यावर ते हसून म्हणाले, ‘मग तुम्हाला गुणवंत पुरस्कार मिळणे अवघड आहे.’ ‘नाही मिळाला तरी चालेल.’ ‘मी पात्र आहे, यातच समाधानी आहे. माझ्या सहकार्‍यांनी आग्रह केला, म्हणून मी हा अर्ज भरला होता.’ मी म्हणालो. काही दिवसांनी पुरस्कार जाहीर झाले.

योगायोगाने त्यांना पुरस्कार मिळालेला होता. मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला. बोलता बोलता सहज म्हणालो, तुम्हाला कसा काय पुरस्कार मिळाला? मग त्यांनी पुरस्कार मिळण्यामागचे गुपित सांगितले; पण त्यांनी मला ते प्रश्न मला रेल्वे प्रवासात का विचारले होते, यावर ते हताशपणे म्हणाले होते, ‘कसं सांगणार तुम्हाला?’