आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोप्या घालण्याची सवय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल टोप्या घालण्याची सवय अनेकांना जडलेली दिसून येते. मित्र, नातेवाईकही टोपी घालण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अनेक जणांनी मला फिट टोप्या घातल्या आहेत. किंबहुना मला स्वत:ला टोपी घालून घेण्याची हौस आहे, असे माझी बायकोच गमतीने म्हणते. माझ्या एका मित्राचाच अनुभव सांगतो. माझा एक मित्र होता. म्हणजे आता त्याची-माझी भेटच होत नाही; परंतु तो नेहमी भेटला की, त्याच्या कौटुंबिक अडचणी सांगायचा. मला त्याच्याविषयी कणव होती. तो घरी आला... की बायको आणि मुलांचे डोळे मोठाले होत. बाबा याला काही पैसे देऊ नका, असे माझा एक मुलगा कानात कुजबुजूनही जात असे; परंतु तिकडे दुर्लक्ष करत मी थोडीफार मदत करत असे. दोन दिवसांत देतो, असे सांगून उसनवार नेलेले पैसे पठ्ठ्याने परत कधी केलेच नाहीत. रक्कमही फारशी नसायची. कमीत कमी दोनशे आणि जास्तीत जास्त पाचशे. पाचशेची रक्कम फार कमी वेळेला मागायचा. कारण माझीही तितके पैसे देण्याची ऐपत नव्हती. हे त्यालाही चांगले माहीत होते. मी अनेकदा मनाशी खूणगाठ बांधून ठेवत होतो की, याला यापुढे मदत करायची नाही; पण तो अशी काही अडचण सांगायचा की, मला नाही म्हणणे जिवावर यायचे. मी त्याच्यावर चिडून म्हणायचो, अन्या... लेका, माझे मागचे पैसे द्यायचा पत्ता नाही. दर वेळेस पैसे घेऊन जातोस, देण्याचे नाव काढत नाहीस. कधी-कधी संध्याकाळी पैसे मागतोस. मला तर वेगळाच संशय येतोय.

दारू तर पीत नाहीस ना! तो लगेच केविलवाणा चेहरा करून म्हणायचा, नाही रे! पोराची ट्यूशन फीस भरायची होती. माझ्याजवळचे पैसे संपले. तुझ्याकडे असतातच कधी? असे मी म्हटले की, तो माझ्याकडेच रागीट चेहरा करून पाह्यचा. शेवटी दोनशेला खिसा कापला जायचाच. नंतर नंतर तर माझी-त्याची भेटही होईनाशी झाली. कामाच्या व्यापात मीही त्याला विसरून गेलो. नंतर समजले की, त्याने गाव सोडले. मला दोन-पाच हजारांना खड्ड्यात घातले होते. नंतर त्याच्या परिचितांपैकी एक-दोघांशी भेट झाली. त्यांनाही थोडीफार नव्हे, तर एकाला पंचवीस हजार आणि दुसर्‍याला दीड लाखाची टोपी घालून औरंगाबाद सोडले होते. मला तर आश्चर्याचा मोठा धक्काच बसला.